मुंबई- राज्यातील काही भागांना सध्या दुष्काळाच्या
झळा सोसाव्या लागत आहे. मात्र तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र
नवनिर्माण सेना २७ नोव्हेंबरला १२२ तालुक्यांमध्ये दंडुका मोर्चा काढणार आहे.
परंतु या मोर्चात राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मनसे नेते नितीन
सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्य सरकारने बऱ्याच जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर
केला परंतु त्यावर कोणत्याच उपाययोजना करण्यात न आल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या
संकटात सापडला आहे. तसेच, राज्यात ईतरही अनेक गंभीर
प्रश्न आहेत त्याची कुठल्याही प्रकारची दखल सरकार घेत नाही. त्यासाठी मनसे आक्रमक
झाली असून याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरला १२२
तालुक्यांमध्ये दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे.
















